‘शिवसेनेनं त्यावेळी हट्टवादी भूमिका घेतली, ज्यामुळे…’; शिवसेना-भाजप युती तुटण्यावर शिवसेना नेत्याचा दावा
त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधत भाजपने नाही तर शिवसेनेनं युती तोडली असा दावा करत टीका केली होती. तर यावरून ठाकरे गटाने देखील यावरून टीका केली होती.
सातारा, 10 ऑगस्ट 2023 । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापुर्वीच दिल्लीत राज्यातील ‘एनडीए’च्या खासदारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधत भाजपने नाही तर शिवसेनेनं युती तोडली असा दावा करत टीका केली होती. तर यावरून ठाकरे गटाने देखील यावरून टीका केली होती. त्यानंतर यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असतानाच शिंदे गटाचे नेते मंत्री शंभुराज देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते विधान सत्य असल्याचे म्हटलं आहे. यावेळी देसाई यांनी, शिवसेना-भाजप युती ही शिवसेनेने तोडली हे नरेंद्र मोदी यांचे विधान अगदी योग्य आहे. त्यावेळी शिवसेनेने हट्टवादी भूमिका घेऊन अपेक्षा जास्त जागा त्यावेळी मागितल्या होत्या. त्यामुळे भाजपबरोबर असलेली युती तुटल्याचे म्हटलं आहे.
Published on: Aug 10, 2023 09:42 AM
Latest Videos