‘ते’ संपादक आहेत, त्यामुळे नवीन नवीन शब्द ते वापरतात; सरवणकर यांचा कोणावर हल्ला
उद्धव टाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जनता सगळं पाहतेय. 2024 नंतर याच लफंग्यांना लोक रस्त्यावर उतरून मारतील असं म्हटलं होतं
मुंबई : शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांना पोलिसांनी गोळाबार प्रकरणावर क्लीनचिट दिल्यानंतर उद्धव टाकरे गट आक्रमक झाला आहे. याप्रकरणी दादर पोलीस स्टेशनवर ठाकरे गटाकडून मोर्चा काढला जाणार आहे. गोळीबार प्रकरणी अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली होती. तर उद्धव टाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जनता सगळं पाहतेय. 2024 नंतर याच लफंग्यांना लोक रस्त्यावर उतरून मारतील असं म्हटलं होतं. त्यावर सरवणकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना, राऊत हे संपादक आहेत. त्यांच्याकडे शब्दकोश खूप मोठा आहे. त्यामुळे नवीन नवीन शब्द ते वापरतात. पण त्यांच्या या शब्दांकडे किंवा ते जे काही बोलतात त्याच्याकडे महाराष्ट्रातील जनता काय विशेष लक्ष देत आहे असं वाटत नाही
Published on: Mar 11, 2023 01:23 PM
Latest Videos