अशोक चव्हाण जास्त दिवस… शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यानं पूर्वीच काय केलं होतं भाकित?

| Updated on: Feb 12, 2024 | 2:03 PM

अशोक चव्हाण यांचा हा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्काच असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

Follow us on

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांचा हा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्काच असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘अशोक चव्हाण जास्त दिवस कॉंग्रेसमध्ये राहणार नाही. यासंदर्भात मी पूर्वीच भाकित केलं होतं. आता जास्तीत जास्त ते लोकसभा निवडणूक पार पाडतील. काँग्रेसमध्ये जे नाराज आहेत ते सर्वच आता पक्षातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. तर आता महाराष्ट्राची जी कमिटी केली आहे, ती निवड समिती ५२ लोकांची आहे. राज्यात ४८ जागा लढवायच्या त्यात आघाडी करायची त्याची निवड करण्यासाठी ५२ लोकं…यावरून दिसून येतं की यांच्यात सारं अलबेल आहे. ‘