‘ठरल्याप्रमाणे खोट बोलण्याची प्रथा कायम ठेवली’; राऊत यांच्यावर कोणीची आगपाखड? पाहा काय केली टीका

‘ठरल्याप्रमाणे खोट बोलण्याची प्रथा कायम ठेवली’; राऊत यांच्यावर कोणीची आगपाखड? पाहा काय केली टीका

| Updated on: Aug 14, 2023 | 8:14 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून भाजपने विरोध केला. त्यामुळेच भाजप-शिवसेना युती तुटल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावरून शिंदे गट आणि भाजपकडून आता पलटवार केला जात आहे.

औरंगाबाद, 14 ऑगस्ट 2023 | नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युती तुटण्याबात केलेल्या वक्तव्यावरून सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून भाजपने विरोध केला. त्यामुळेच भाजप-शिवसेना युती तुटल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावरून शिंदे गट आणि भाजपकडून आता पलटवार केला जात आहे. याचमुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. यावेळी शिरसाट यांनी, राऊतने ठरल्याप्रमाणे खोट बोलण्याची प्रथा नेहमीप्रमाणे कायम ठेवली. तर २०१९ मध्ये पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल अशी घोषणा उद्धव ठाकरे यांच्यासमोर कितीतरी सभांमध्ये झाली होती. पण त्यांनी त्यावेळी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तर सत्तेच वाटप हे 50-50 व्हायला हवी हे सर्वांना मान्य होत. तर ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांच नाव पुढे केलं आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली होती. मात्र आमच्यातील काही पोपटपंच्यांनी एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर ते संघटना हातात घेतील, तुमचं महत्व कमी करतील असा किडा ठाकरे यांच्या डोक्यात भरला. तर शिंदे यांच्या नावाला कुठही विरोध नव्हता. तर राऊत यांच्यासारख्यांचा कल हा युती तोडण्याकडे होता असा घणाघात त्यांनी केला आहे.

Published on: Aug 14, 2023 08:14 AM