Video | आनंद दिघेंनी गद्दारीनंतर ठाण्यात काय केलं होतं? इतिहासात नोंद हवी, अरविंद सावंतांनी सांगितलेला किस्सा ऐकला?
ठाण्यातील सर्व नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते. पाच वर्ष ठाण्यात नगरसेवक नव्हता. एकाने गुन्हा केला म्हणून सगळ्यांना शिक्षा मिळाली होती... ही आठवण अरविद सावंत यांनी सांगितली.
मुंबईः दसरा मेळाव्यावरून (Dussehra Melava) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेले आहेत. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार की नाही, याचा निर्णय उद्या हायकोर्टात (high court) घेतला जाणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाकडून वापरण्यात येणाऱ्या विखारी भाषेवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधी अशी भाषा वापरणाऱ्यांवर लगाम घालावा, अशी मागणी त्यांनी केलीय. तसेच शिवसेना नेते आनंद दिघे (Anand Dighe) आज असते तर गद्दारांना काय शिक्षा केली असती, याचा एक किस्साही त्यांनी सांगितला. ते म्हणाले, ‘ ज्या आनंद दिघेंचं तुम्ही नाव घेता. त्यांनी गद्दारी झाल्यावर ठाण्यात काय केलं होतं आठवतंय का? खोपकर यांनी गद्दारी केली होती. त्यांना आसमान दाखवलं होतं. त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, इतिहासात नोंद व्हायला पाहिजे. ठाण्यातील सर्व नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते. पाच वर्ष ठाण्यात नगरसेवक नव्हता. एकाने गुन्हा केला म्हणून सगळ्यांना शिक्षा मिळाली होती…