खासदार कीर्तीकर यांच्यावर कोणाची खरमरीत टीका म्हणाला, ‘आमच्याकडं जेष्ठ, पण…; दबाव असू शकतो?’
एनडीएमध्ये आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे, असं कीर्तीकर म्हणाले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील अंतर्गत धुसफुस समोर आली होती. आता मात्र ते सारवासारव करताना दिसत आहेत. तसेच या विशयावर पडदा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई : शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी त्यांच्या सापत्न वागणूक या आधीच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला आहे. एनडीएमध्ये आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे, असं कीर्तीकर म्हणाले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील अंतर्गत धुसफुस समोर आली होती. आता मात्र ते सारवासारव करताना दिसत आहेत. तसेच या विशयावर पडदा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यावरून आता किर्तीकर यांनी, भाजपकडून सापत्न वागणूक मिळतेय असं मी बोलोच नाही, माझ्या तोंडात ते टाकलं गेलं असं ते म्हणालेत यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करताना, ते आमच्याकडे जेष्ठ होते. मात्र तिकडे गेल्यावर त्यांचा काय स्टेटस आहे आता माहित नाही. तर त्यांनी आपल्याला सापत्न वागणूक दिली जाते असेच म्हटलं होतं. हवं तर आणखी एकदा तपासावं. तर त्यांनी घुमजाव केल्याचं ऐकलं. कदाचित त्यांच्यावर दबाव असावा. त्यामुळे त्यांनी घुमजाव केलं असेल.