शिवसेना खासदाराकडून अजित पवार यांच्यासह शिंदे गटाची फिरकी, म्हणाला, “…मग आता अर्थ खातं…”
राष्ट्रवादीत राजकीय भूकंप आला आणि घडळ्याचे दोन तुकडे झाले. यावरून शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका करताना अजित पवार यांची फिरकी घेतली.
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि इतर 8 नेत्यांचा काल अचानक शपथविधी पार पडला. ज्यामुळे राष्ट्रवादीत राजकीय भूकंप आला आणि घडळ्याचे दोन तुकडे झाले. यावरून शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका करताना अजित पवार यांची फिरकी घेतली. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटावर टीका करताना महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्या शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवार यांच्यावर निधी वाटपावरून टीका केली त्यांनी काल त्यांच स्वागत केलं. त्यामुळे त्यांची आता खरी अडचण तेव्हा होईल जेंव्हा खाते वाटप झाल्यावर अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे जाईल. यानंतरचे राजकारण पाहण्यासाठी महाराष्ट्र प्रतीक्षेत आहे. नेमक भविष्यात काय होणार आहे ते पहावं लागेल असेही ते म्हणाले. तर अजित पवार निधी देत नाहीत. त्यामुळे सेना संपायची वेळ आली असे सांगत अनेक जण शिंदे सोबत भाजपत गेले. आता अजित दादा काही नीट झाले कां? हे सगळं सोयीचे राजकारण आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.