Priyanka Chaturvedi After Hearing |आम्ही जागेवर आहोत पळतंय कोण ते बघा, प्रियांका चतुर्वेदींचा घणाघात
शिवसेना एकच आहे, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आज शरद पवारांच्या घरी बैठक होतेय. त्या बैठकीत मी सहभागी होणार आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टान तिखट सवाल विचारले. 6 वकील बाजू लढवतायत तरी कोर्टानं सवाल उपस्थित केले. सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला सांगितलं की, चिन्हाबाबतचा निर्णय घेऊ नका. उपमुख्यमंत्री दिल्लीला येतायेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले. त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केले. त्यांच्या गोटात हालचाल वाढली आहे. आम्ही जागेवर आहोत, पळतंय कोण बघा. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. आज कोर्टानं निवडणूक आयोगाला सांगितलं आहे. सोमवारी पुन्हा सुनावणी होतेय. शिंदे गट शिवसेना नाही तर भाजपा आहे. जड भाजपा आणि हलकी भाजपा. शिवसेना एकच आहे, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आज शरद पवारांच्या घरी बैठक होतेय. त्या बैठकीत मी सहभागी होणार आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
Published on: Aug 04, 2022 08:43 PM
Latest Videos