शिवसेना नेते संजय राऊत बेळगावात कोणावर साधणार सिधा निशाना?
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या जाहीर प्रचारासाठी राऊत हे बेळगाव दौऱ्यावर येत असून बुधवार दि. 3 मे रोजी त्यांच्या सीमा भागात दोन प्रचार सभा होणार आहेत.
बेळगाव : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची तोफ आज बेळगावात विरोधकांवर डागली जाणार आहे. त्यामुळे बेळगाव वासियांनी त्यांची रोखठोख भाषण शैली पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ते यावेळी कोणावर सडकून टीका करणार आणि कोणाला निशाना करणार याची चर्चा आता बेळगावसह महाराष्ट्रातही सुरू आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या जाहीर प्रचारासाठी राऊत हे बेळगाव दौऱ्यावर येत असून बुधवार दि. 3 मे रोजी त्यांच्या सीमा भागात दोन प्रचार सभा होणार आहेत. दक्षिण विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारासाठी येत आहेत. प्रचारसभेसह त्यांची वडगाव दुचाकी रॅली होणार आहे. ते संयुक्त महाराष्ट्र चौकातील संयुक्त जाहीर सभेत सहभागी होणार आहेत.
Published on: May 03, 2023 10:09 AM
Latest Videos