बेळगावात भगवा वारंवार उतरवला जातोय, भूमिका घ्याच; सत्कार करू, राऊत फडणवीस यांच्यावर भडकले

बेळगावात भगवा वारंवार उतरवला जातोय, भूमिका घ्याच; सत्कार करू, राऊत फडणवीस यांच्यावर भडकले

| Updated on: Apr 30, 2023 | 1:03 PM

महाराष्ट्रातून मॉरेशियसला जाऊन अभिमानानं भगवा फडकवला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करून आलात. तेथे भगवा वर नेला जात असताना बेळगावात मात्र भगवा वारंवार खाली आणला जातो. त्यावर भूमिका घ्या.

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांनी कर्नाटक प्रचार आणि बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारावरून निशाना साधला. तसेच महाराष्ट्रातून मॉरेशियसला जाऊन अभिमानानं भगवा फडकवला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करून आलात. तेथे भगवा वर नेला जात असताना बेळगावात मात्र भगवा वारंवार खाली आणला जातो. त्यावर भूमिका घ्या. आम्ही तुमचा सत्कार करू असे त्यांनी म्हटलं आहे. तर मराठी माणसाला पराभूत करण्यासाठी कर्नाटकात भाजपच्या झुंडी जात आहेत लाज वाटली पाहिजे असं ते म्हणाले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असे आपेल आवाहन असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.