नारायण राणे नामर्द माणूस आहेस. ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं पळाला आहे... : संजय राऊत

नारायण राणे नामर्द माणूस आहेस. ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं पळाला आहे… : संजय राऊत

| Updated on: Jan 06, 2023 | 4:58 PM

संजय राऊत यांनी नारायण राणेंवर तोफ डागताना आता माझा संयम संपला आहे. नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना आता मी नागडाच करतो. त्यांची प्रकरणेच बाहेर काढतो असा इशाराच दिला आहे

मुंबई : राज्यातील राजकारण कोणत्या विषयामुळे आणि कोणामुळे तापेल हे काही सांगता येत नाही. आधी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगलेला कलगितूरा आता केंद्रीय मत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यात रंगला आहे. राणे विरुद्ध राऊत वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे दिसत आहे.

संजय राऊत यांनी नारायण राणेंवर तोफ डागताना आता माझा संयम संपला आहे. नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना आता मी नागडाच करतो. त्यांची प्रकरणेच बाहेर काढतो असा इशाराच दिला आहे.

तर नारायण राणे पदरा पावटा आहे, याला कोण घाबरतो, असा सवाल राऊतांनी करत नारायण राणे, माझ्या नादाला लागू नकोस. कालपर्यंत गप्प होतो. आज तू मर्यादा सोडली आहेस. नामर्द माणूस आहेस तू. ईडी आणि सीबीआयच्या भीतीनंच पळाला आहेस असं म्हटलं आहे

Published on: Jan 06, 2023 04:58 PM