Sanjay Raut : लोकशाही धोक्यात या राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमतीवर संजय राऊत म्हणतात…
देशातली लोकशाही संपली आहे. तिचा मुडदा पडला आहे, असं गंभीर भाष्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल आहे. त्याचबरोबर त्यांनी राहुल गांधी यांच्या भारतातील लोकशाही धोक्यात असल्याच्या विधानाशी आपण सहमत असल्याचेही म्हटलं आहे.
Sanjay Raut : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतंच लंडन येथील केम्ब्रिज विद्यापीठात भाषण केलं. यावेळी त्यांनी भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं होतं. त्यावर जगभरात चर्चा सुरु आहे. त्यातच यावर आपण सहमत असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी देशातली लोकशाही संपली आहे. तिचा मुडदा पडला आहे, असं गंभीर भाष्य देखिल केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राऊत म्हणाले, देशातील सर्व विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे. काँग्रेस, आप, नॅशनल कॉन्फरन्स असो. अखिलेश यादव, सर्वांनी एकत्रितपणे लढलं पाहिजे. त्यामुळेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदींना पत्र लिहून कळवलं आहे.
Published on: Mar 06, 2023 02:13 PM
Latest Videos