‘करमचंद काय म्हणताय तुम्ही तर फेकुचंद’, संजय राऊत यांनी कोणावर केली टीका ?
महाराष्ट्राला थोर मुख्यमंत्र्याची परंपरा आहे. मुख्यमंत्र्यासोबत थोर साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, संशोधक असतात. तुमचं नाव आदराने घ्यावे असे कोणते काम तुम्ही केले आहे अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. तुम्ही तर चोरांचे सरदार आहात असाही टोला राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
मुंबई | 11 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची एक थोर परंपरा राहीली आहे. त्यांच्यासोबत थोर साहित्यिक, विचारवंत, संशोधक राहीले आहेत. तुमच्यासोबत चोर, खूनी, बलात्कार करणारे, अपहरणकर्ते, खंडणीखोर आहेत तुम्ही चोर मंडळाचे सरदार आहेत अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना नगरसेवर अभिजीत घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा फेसबुक लाईव्हमध्ये दिसत नसल्याने नक्की गुंड मॉरीस यानेच त्यांची हत्या केली की या दोघांना कोणी सुपारी देऊन संपविले असा संशय व्यक्त करीत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे करमचंद झाले आहेत का ? अशी टीका केली होती. त्यानंतर त्यास संजय राऊत यांनी त्यावर उत्तर दिले आहे. करमचंदने तरी चांगले काम केले होते. तुमचं नाव घ्यावं असे तुम्ही काय चागलं काम केलं आहे. उद्धव ठाकरे एक सभ्य सुसंस्कृत, विद्वान, ज्यांचं छायाचित्रण कलेत चांगले नाव आहे, असे व्यक्तीमत्व आहे. तुमचं काय, जे तुरुंगात असायला हवेत ते तुमच्यासोबत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.