अरे तू बेलवर बाहेर आहेस, तुला कधीही आत टाकू; राऊत यांना नितेश राणे यांची धमकी

अरे तू बेलवर बाहेर आहेस, तुला कधीही आत टाकू; राऊत यांना नितेश राणे यांची धमकी

| Updated on: Apr 27, 2023 | 2:35 PM

त्यांनी, हा काय बेळगावला जाणार? बेळगावच्या मराठी माणसाबद्दल बोलणार? मराठी माणसासाठी जाणार म्हणे. मग काय पत्राचाळीत राहणारे पाकिस्तानी होते काय? त्यांच्या हक्काचं काय? जे पत्राचाळीत राहत होते त्यांना बेघर केलं. त्यांचे पैसे खाल्ले आणि आज मराठी माणसाचा गोडवा, मराठी माणसासाठी बेळगाव जाण्यासाची भाषा करत आहे.

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 3 तारखेला बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेची तोफ आता कर्नाटकात धडाडणार आहे. यावरूनच भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. त्यांनी, हा काय बेळगावला जाणार? बेळगावच्या मराठी माणसाबद्दल बोलणार? मराठी माणसासाठी जाणार म्हणे. मग काय पत्राचाळीत राहणारे पाकिस्तानी होते काय? त्यांच्या हक्काचं काय? जे पत्राचाळीत राहत होते त्यांना बेघर केलं. त्यांचे पैसे खाल्ले आणि आज मराठी माणसाचा गोडवा, मराठी माणसासाठी बेळगाव जाण्यासाची भाषा करत आहे, अशी टीका केली आहे. आधी या मराठी माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न कर म्हणावं. जर 3 तारखेला राऊत जाणार असेल तर मी ही येतो पत्राचाळीतल्या लोकांना घेऊन. बघू मग कोण खरं बोलत आहे ते. स्वतः बेलवर बाहेर आहे. अरे तू बेलवर बाहेर आहेस तुझी बेलची ऑर्डर सगळ्यांच्या हातात आहे. तुला कधीही आत टाकू शकतो. अशी तुझी परिस्थिती आहे असा घणाघात केला आहे.

Published on: Apr 27, 2023 02:35 PM