Sanjay Raut on Election | अपक्षांवर ईडी, सीबीआयचा दबाव टाकला जातोय

Sanjay Raut on Election | अपक्षांवर ईडी, सीबीआयचा दबाव टाकला जातोय

| Updated on: Jun 04, 2022 | 12:13 PM

राज्यसभेच्या सहा जागांसाठी यंदा सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी पाच उमेदवारांची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तर सहाव्या जागेसाठी दोन उमेदवारांमध्ये लढत होईल. यात शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत निवडणूक होईल.

मुंबईः राज्यसभेची (Rajyasabha Election) सहावी जागा महाविकास आघाडीच जिंकणार असल्याचा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे हा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप अपक्षांवर दबाव आणतंय. ईडी, सीबीआय (CBI) सारख्या तपासयंत्रणांद्वारे अपक्ष आमदारांना भीती दाखवली जातेय, असा आरोप संजय राऊत यांनी केला. मात्र भाजपने कितीही घोडेबाजारी केली, कितीही पैसा ओतला तरीही सहावी जागा मविआ जिंकणार आहे. त्यामुळे भाजपने यात पैसा वाया घालवू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. भाजपचं चरित्र उघडं होतंय. महाराष्ट्रात असा प्रकारे निवडणूक लढवली जात असेल तर जनता पाहतेय. भाजपने असे पैसे एखाद्या सामाजिक कार्यात वापरावेत. बाकी गोष्टीसाठी मुख्यमंत्री समर्थ आहेत. मागील 50 वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. याचा अनुभव सर्वाधिक आम्हाला जास्त आहे. फक्त ईडी, सीबीआय तुमच्या हातात आहे असले तरी आमच्या हातात इतरही गोष्टी आहेत.. असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

 

 

Published on: Jun 04, 2022 12:13 PM