‘प्रफुल्ल पटेल भाजपच्या स्क्रिप्टवर बोलतात’; नाना पटोले यांचा मिश्किल टोला
2019 मध्ये पहाटेचा शपथविधी, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरूंग लावत आलेले शिंदे-फडणवीस सरकार. यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेलं असतानाच आता राष्ट्रवादीत ही सत्तासंघर्ष सुरू झाला आहे.
मुंबई : राज्यात गेल्या तीन साडे तीन वर्षात शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेवरून सारीपाट लावला जात आहे. 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरूंग लावत आलेले शिंदे-फडणवीस सरकार. यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेलं असतानाच आता राष्ट्रवादीत ही सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादीतही उभी फूट अजित पवार यांच्या बंडामुळे पडली आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप करत टीका केली आहे. त्यांनी, मोदी आणि शाह यांच्या स्क्रिप्टनुसार प्रफुल्ल पटेल बोलतात असा अरोप केला आहे. तर मोदी-शाह यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्याप्रमाणे पटेलांना बोलावं लागतं. मोदी-शाह यांच्या फॉर्म्युला हा सत्तेत या नाहीतर जेलमध्ये जा असा आहे. त्यामुळे त्यांना सत्तेत जाताना तसं बोलावं लागतं आहे.