नितेश राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गट आक्रमक; कोणकनातील नेत्याने घेतला समाचार
नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी आधी खरपूस समाचार घेतला. त्यांनी, भाजपने आदेश दिला तर नितेश राणे तू, तुझा भाऊ आणि तुझा बाप आपले राणे आडनाव देखील भाजपत विलीन कराल असा टोला लगावला.
मुंबई : शिवसेना पक्ष राष्ट्रवादीत विलीन होणार असा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाकडून चांगलाच पलटवार करण्यात आला आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी आधी खरपूस समाचार घेतला. त्यांनी, भाजपने आदेश दिला तर नितेश राणे तू, तुझा भाऊ आणि तुझा बाप आपले राणे आडनाव देखील भाजपत विलीन कराल असा टोला लगावला. तर आता त्याच वक्तव्यावरून आमदार वैभव नाईक यांनी देखील नितेश राणे यांना टोला लगावला आहे. नाईक यांनी राणे यांनी स्वतःचा पक्ष किती दिवसात विलीन केला याचा इतिहास पाहून नंतरच शिवसेनेवर टीका करावी, असा उपरोधक टीका केली आहे. तर इडीच्या भीतीने आपला पक्ष भाजपत विलीन केला त्यांनी आपल्या मंत्रिपदाची चिंता करावी असे देखील नाईक यांनी म्हटलं आहे.
Published on: May 30, 2023 07:10 AM
Latest Videos