आदित्य ठाकरे हे खोके बहाद्दर, त्यांनी असं बोलणं चुकीचं; केसरकरांचा घणाघात

आदित्य ठाकरे हे खोके बहाद्दर, त्यांनी असं बोलणं चुकीचं; केसरकरांचा घणाघात

| Updated on: Apr 08, 2023 | 2:50 PM

आदित्य ठाकरे यांच्याकडे एक टीम आहे जी त्यांना खोट कशं बोलायचं हे शिकवते. मुंबईचा पैसा कोणी लुटला? हे सर्व जनतेला माहिती आहे. आपल्याला ठाकरे फॅमिलीबद्दल आदर असल्याने त्यांच्याविरोधात काही बोलत नाही

अयोध्या : शिवसेना नेते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे एक टीम आहे जी त्यांना खोट कशं बोलायचं हे शिकवते. मुंबईचा पैसा कोणी लुटला? हे सर्व जनतेला माहिती आहे. आपल्याला ठाकरे फॅमिलीबद्दल आदर असल्याने त्यांच्याविरोधात काही बोलत नाही. पण मंत्र्यांकडून किती पैसे मागितले. ज्यांनी नाही दिले त्यांना कसे मंत्रीपदापासून कसं काढले हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे अशा खोके बहाद्दरांनी बोलू नये. शेवटी नैतिकता असते आणि नैतिकता ज्या वेळेला सोडली जाते. त्यावेळी लोकांचा संयमाचा बांध तुटतो. तो तुटू नये यासाटी शांत रहा. अन्यथा त्यांच्या अनेक गोष्टी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाहीत. याच्या आधी ते ठाकरे महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत हे कोणालाच माहिती नसल्याचा टोला देखिल केसरकर यांनी लगावला.

Published on: Apr 08, 2023 02:50 PM