मंत्रिमंडळाचा विस्तारावरून शिंदे गटात रस्सीखेच? शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘मी गाऱ्हाणं घालायला’
तर सध्या भरत गोगावले, अनिल बाबर आणि योगेश कदम यांची नावे निश्चित मानली जात आहेत. याचदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या देखील नावाची चर्चा समोर येत आहे.
ठाणे : राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारावरून सध्या शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांकडून आणि मित्र पक्षांकडून नाराजी व्यक्त केली आहे. तर सध्या भरत गोगावले, अनिल बाबर आणि योगेश कदम यांची नावे निश्चित मानली जात आहेत. याचदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या देखील नावाची चर्चा समोर येत आहे. यावरून सरनाईक यांनी, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे गेल्या आठवड्यापासून आम्ही ऐकत आहोत. तर तीन पक्षाचे सरकार आहे काहीतरी तडजोडी कराव्या लागतात असे त्यांनी म्हणताना, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सुचक वक्तव्य केलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा दिलेला शब्द पाळतात हा इतिहास आहे. दिलेल्या शब्दाला जागतात हे कर्तव्य समजतात. त्यामुळे मी कोणाकडे गाऱ्हाणं घालायला जाणार नाही. मी स्वाभिमानी आहे. माझा जसा स्वभाव आहे. तसा मी राहणार असेही त्यांनी म्हटलं आहे.