कालच्या जाहिरातीवरून खिल्ली उडवलीच, आज देखील धू धूतलं; अजित पवार यांनी लगावला शिंदे यांना टोला
पण यावरुन आता विरोधकांसह भाजपकडून देखील प्रतिक्रिया येताना दिसत आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो वगळण्यावरून शिंदे गटाला लक्ष करण्यात आलं होतं. तर आज विरोधकांनी मागितलेली उत्तर का दिली जात नाहीत यावरून शिंदे गटासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरलं जात आहे.
मुंबई : शिवसेनेनं काल राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती छापून आणल्या होत्या, त्यावर टीका झाल्यानतंर आज पुन्हा नव्यानं जाहिराती दिल्या. पण यावरुन आता विरोधकांसह भाजपकडून देखील प्रतिक्रिया येताना दिसत आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो वगळण्यावरून शिंदे गटाला लक्ष करण्यात आलं होतं. तर आज विरोधकांनी मागितलेली उत्तर का दिली जात नाहीत यावरून शिंदे गटासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरलं जात आहे. यावरूनच प्रवीण दरेकर यांचादेखील नाराजीचा सुर दाखवला आहे. तर याचमुद्द्यावर अजित पवार यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. कालच्या जाहिरातीवर उत्तरं द्यायला हवी होती असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. जो बुंद से गयी वो हौद से नही आती असंच काहीस कालच्या जाहिरातीवरून झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ या २०१४ ची विधानसभा निवडणूक, २०१९ ची निवडणूकमधील घोषणेचं काय झालं याबद्दल कुठंच काही उल्लेख केलेला नाही यावर त्यांनी लक्ष वेधलं आहे.