Shinde Group appointments announced | शिंदे गटाकडून पुन्हा नव्या नियुक्त्या जाहीर – tv9
यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे गटाकडून नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दिलीप लांडे आणि प्रकाश सुर्वे यांच्याकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. दिलीप लांडे हे चांदिवली घाटकोपर विधानसभा क्षेत्राचे प्रभाग प्रमुख म्हणून काम पाहतील. तर प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे विभाग प्रमुख असतील.
शिवसेना विरूद्ध शिंदे गट असा सामना आता पुन्हा एकदा राज्यात रंगाणार आहे. राज्यातील सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला असताना आता पुन्हा एकदा शिंदे गटाकडून नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री होत शिवसेनेला सत्तेतून खाली खेचलं. तर आम्हीच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले आहे. तर त्यांनी उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या नियुक्त्याही रद्द करत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना तेथे संधी दिली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे गटाकडून नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ज्यात दिलीप लांडे आणि प्रकाश सुर्वे यांच्याकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. दिलीप लांडे हे चांदिवली घाटकोपर विधानसभा क्षेत्राचे प्रभाग प्रमुख म्हणून काम पाहतील. तर प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे विभाग प्रमुख असतील.
Published on: Aug 26, 2022 10:37 AM
Latest Videos