5-50 झाडं वाचवली, पारितोषिक मिळवली; त्याच्यापेक्षा जनतेकडं बघितलं असतं तर...; आदित्य ठाकरेंवर कोणाची टीका

5-50 झाडं वाचवली, पारितोषिक मिळवली; त्याच्यापेक्षा जनतेकडं बघितलं असतं तर…; आदित्य ठाकरेंवर कोणाची टीका

| Updated on: Apr 29, 2023 | 3:54 PM

त्यांनी तुम्ही कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, तरी खोटं फार काळ टिकत नाही. आदित्य ठाकरे खोटं बोलत सगळीकडे फिरतायत, पण वस्तुस्थिती काय आहे? त्यांनी पर्यावरण मंत्री असताना महाराष्ट्राला काय दिलं? प्रदूषित नद्या, हवेचं प्रदूषण.

बदलापूर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे उद्योग बाहेर गेल्यावर शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना दिसत आहेत. त्यांनी यावरून शिवसेना मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी तुम्ही कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, तरी खोटं फार काळ टिकत नाही. आदित्य ठाकरे खोटं बोलत सगळीकडे फिरतायत, पण वस्तुस्थिती काय आहे? त्यांनी पर्यावरण मंत्री (Environment Minister) असताना महाराष्ट्राला काय दिलं? प्रदूषित नद्या, हवेचं प्रदूषण. केवळ आरे कॉलनीतील 5-50 झाडं कापायला विरोध करून आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळवायची, यापेक्षा जनतेचं हित पाहिलं असतं, तर मुंबईची हवा प्रदूषित झाली नसती. ज्या उपाययोजना आम्ही आज करतोय त्या त्यांनी त्यावेळी केल्या असत्या तर महाराष्ट्राचं नाव सर्वात प्रदूषित नद्या असलेलं राज्य असं झालं नसतं अशी टीका केली आहे.

Published on: Apr 29, 2023 03:54 PM