निवड चुकली हे पवार यांना अत्ता कळालं; राऊत यांच्यावरून भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचा नवा अध्यक्ष नेमण्यासाठी जी समिती नेमली त्यात भाजपत जाण्याचं संधान बांधणारे नेते होते, असा गंभीर आणि मोठा दावा ठाके गटाने केला आहे.
नांदेड : शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचा वारसदार तयार करण्यात अपयश आल्याचं मोठं विधान करण्यात आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचा नवा अध्यक्ष नेमण्यासाठी जी समिती नेमली त्यात भाजपत जाण्याचं संधान बांधणारे नेते होते, असा गंभीर आणि मोठा दावा ठाके गटाने केला आहे. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात याबाबत वक्तव्य करण्यात आलं. यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या बद्दल सामनात आलेल्या अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आपली निवड चुकली होती अस आता शरद पवार यांना कळालं असेल. ज्यांना स्वत:चा पक्ष, आमदार सांभाळता आले नाहीत. त्यांनी पवार यांनी महाविकास आघाडीचा नेता केला. उद्धव ठाकरे यांची निवड चुकीची केली होती. जो व्यक्ती पक्ष सांभाळू शकत नाही तो तीन पक्षाचा नेता कसा असं आता शरद पवार यांना कळालं असेल. कदाचित याचीच कल्पना उद्धव ठाकरे यांना आली आणि त्यामुळेच संजय राऊत यांच्या तोंडून सामनातून शरद पवार यांच्या बद्दल असं लिहलं जात आहे. तर शरद पवार यांच्याबद्दल काही बोलावं असं काही माझं आयुष्य नाही तेवढी आपली राजकारणाची उंची नाही असेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.