राहुल कुल यांचे टेन्शन वाढणार! मतदारसंघात राऊतांची गर्जना, भीमा पाटसवरून काय बोलणार?

राहुल कुल यांचे टेन्शन वाढणार! मतदारसंघात राऊतांची गर्जना, भीमा पाटसवरून काय बोलणार?

| Updated on: Apr 26, 2023 | 11:19 AM

राऊत व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा दौंड तालुक्यातील वरवंड येथे होणार आहे. तर भीमा बचाव शेतकरी सभासद कृती समितीच्या वतीने या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दौंडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांनी याचं आयोजन केलं आहे.

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार राहुल कुल यांच्यात सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. भीमा सहकारी कारखाना भ्रष्टाचारावरून राऊत यांनी कुल यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तर त्याला कर नाही त्याला डर कशाला म्हणत कुल यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर राऊत यांनी याप्रश्नी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यावरून आता राऊत व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा दौंड तालुक्यातील वरवंड येथे होणार आहे. तर भीमा बचाव शेतकरी सभासद कृती समितीच्या वतीने या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दौंडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांनी याचं आयोजन केलं आहे. यासेभेतून कुल यांच्या कारखान्यातील गैरव्यवहाराची कागदोपत्री पोलखोल केली जाणार आहे. राहुल कुल हे विधीमंडळ हक्कभंग समितीचे अध्यक्ष तथा दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजप आमदार आहेत.

Published on: Apr 26, 2023 11:19 AM