Shambhuraj Desai : ‘सिल्व्हर ओक’ बैठक; ‘काका मला वाचवा’ म्हणत, उद्धव ठाकरे यांच्यावर शंभूराज देसाईंची सडकून टीका
आजपर्यंत ‘मातोश्री’चा इतिहास सर्वांनी पाहिला. कसलीही राजकीय खलबत असो किंवा राजकीय चर्चा, ते सर्व ‘मातोश्री’वर जात होते. पण आज सगळा वारसा गुंढाळून ठेवून ठाकरे हे सिल्व्हर ओकवर गेले. त्यामुळे शिवसैनिकांना वेदना झाल्या
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’वर भेट झाली. ही भेट ठाकरे यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जात घेतल्याने त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. यादरम्यान शिवसेना नेते राज्याचे उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली केली. यावेळी आजपर्यंत ‘मातोश्री’चा इतिहास सर्वांनी पाहिला. कसलीही राजकीय खलबत असो किंवा राजकीय चर्चा, ते सर्व ‘मातोश्री’वर जात होते. पण आज सगळा वारसा गुंढाळून ठेवून ठाकरे हे सिल्व्हर ओकवर गेले. त्यामुळे शिवसैनिकांना वेदना झाल्या. तर आजची स्थिती पाहून काका मला वाचवा अस म्हणायला तर गेले नाही असा घणाघात शंभूराज देसाई यांनी केला आहे.
Published on: Apr 12, 2023 07:46 AM
Latest Videos