खासदार सावंत यांच्यावर रिक्षा चालक आक्रमक; मुलुंड स्थानका बाहेर केला असा संताप व्यक्त
सावंत यांच्या वक्तव्यावरून मुलुंड स्थानक बाहेर रिक्षा चालक-मालक आणि शिवसेना पदाधिकारी रस्त्यावरती उतरून आक्रमक झालेत. त्यांनी अरविंद सावंत यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले
मुलुंड(मुंबई) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यांनी शिंदे यांचा उल्लेख रिक्षावाला मुख्यमंत्री असा केला होता. त्यावरून दहिसर कांदर पाडा आणि मुलुंडमध्ये रिक्षावाल्यांनी सावंत यांच्याविरोधात संपात व्यक्त केला आहे. सावंत यांच्या वक्तव्यावरून मुलुंड स्थानक बाहेर रिक्षा चालक-मालक आणि शिवसेना पदाधिकारी रस्त्यावरती उतरून आक्रमक झालेत. त्यांनी अरविंद सावंत यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. तसेच अरविंद सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्र्यावर जर कोणी टीका केली. तर त्यांच्या घरात घुसून त्यांना तोंडाला चपलेचा मार आणि तोंड काळे करू असा इशारा शिवसेनेने दिला आहे
Published on: Apr 05, 2023 02:23 PM
Latest Videos