'आधी 2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकणार का ते पहा?' शिवसेना मंत्र्याचा राऊत यांच्यासह जयंत पाटील यांना टोला

‘आधी 2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकणार का ते पहा?’ शिवसेना मंत्र्याचा राऊत यांच्यासह जयंत पाटील यांना टोला

| Updated on: May 31, 2023 | 12:01 PM

शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार संपर्कात असल्याचं विनायक राऊत म्हणाले. राऊत यांनी त्यांची बाजू मांडताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची नावं घेतली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपुर्वी शिंदे गटातील आमदार आणि खासदारांबद्दल खळबळजनक दावा केला. त्यात त्यांनी शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार संपर्कात असल्याचं विनायक राऊत म्हणाले. राऊत यांनी त्यांची बाजू मांडताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची नावं घेतली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यावरून रोहयो मंत्री आणि संभाजीनगरचे पालकलमंत्री संदिपान भुमरे यांनी पलवार केला आहे. त्यांनी असंतोष कोणाच्याच मनात नाही. तर कोणाही ठाकरे गटात जाणार नाही. उलट ठाकरे गटातीलच जे उरलेले आमदार आहेत तेच आता शिंदे यांच्या शिवसेनेत येतील. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही आमदार, खासदार हे शिंदे गटात येणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: May 31, 2023 12:00 PM