‘मोदी-अदानी’ ही नावे आता भ्रष्टाचाराची प्रतीके; सामनातून केंद्र सरकारवर निशाना
गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे नाते नेमके काय? अदानी यांच्या भ्रष्टाचाराचे संरक्षक म्हणून पंतप्रधान पहाडासारखे का उभे आहेत? अदानी यांच्या कंपनीत बेकायदेशीरपणे गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये नक्की कोणाचे? त्या प्रश्नांची उत्तरे निदान 'ईडी' आणि सीबीआयने तरी द्यायला हवीत
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनातून केंद्र सरकारवर टीका होत असते. आताही सामनातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली असून ‘मोदी-अदानी’ ही नावे आता भ्रष्टाचाराची प्रतीके बनली आहेत असा हल्लाबोल करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. तर गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे नाते नेमके काय? अदानी यांच्या भ्रष्टाचाराचे संरक्षक म्हणून पंतप्रधान पहाडासारखे का उभे आहेत? अदानी यांच्या कंपनीत बेकायदेशीरपणे गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये नक्की कोणाचे? त्या प्रश्नांची उत्तरे निदान ‘ईडी’ आणि सीबीआयने तरी द्यायला हवीत. मात्र खऱ्या चोरांना संरक्षण व दरोडेखोरांना प्रतिष्ठा देण्याचे काम या दोन्ही संस्था आज करीत आहेत. मोदी म्हणतात, ‘सत्तर वर्षांत काँग्रेस सरकारने काहीच केले नाही. फक्त सात वर्षांत भाजपने देश प्रगतीपथावर नेला.’ असा हल्लाबोल सामनातून केला आहे.