मी काय चुकलो?, म्हणत राऊत कडाडले, ‘कायदा आणि सुव्यवस्था…’
बार्शी हल्ल्यातील मुलीचा फोटो ट्वीट केला. तसेच राऊत यांनी भाजपवर आरोप करत जोरदार टीकाही केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या बार्शी प्रकरणावरील ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. बार्शीत अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलीवर हल्ला झाला. त्या हल्ल्यातील मुलीचा फोटो ट्वीट केला. तसेच राऊत यांनी भाजपवर आरोप करत जोरदार टीकाही केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
यावर मी काय चुकलो? असा सवाल करत राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय असा गंभीर आरोप केला. तर एका कुटुंबातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन कली जाते. एका चुंबन प्रकरणाच्या व्हिडीओवरून एसआयटी स्थापन केली जाते. एका मुलीचा फोटो ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला जातो. एका खासदारावर, एका पत्रकारावर गुन्हा दाखल होतो. या राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय ते यातून स्पष्ट दिसतंय, अशा शब्दांत संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.