मालेगावात ठाकरेंची तोफ धडाडणार; सभेची जय्यत तयारी सुरु आणि उत्सुकताही

मालेगावात ठाकरेंची तोफ धडाडणार; सभेची जय्यत तयारी सुरु आणि उत्सुकताही

| Updated on: Mar 25, 2023 | 9:25 AM

उद्धव ठाकरे यांच्या सभेला आता एकच दिवस उरला असून महाराजा सयाजी महाराज गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे

मालेगाव : शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण शिंदे यांनी घेतल्यापासून उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार घणाघात होताना दिसत आहे. शिंदे गट आणि भाजपवर प्रहार करणारी पहिली सभा त्यांनी कोकणातील खेड येथे घेतली. त्यानंतर आता दुसरी सभा मालेगावात होत आहे. ही सभा 26 मार्च रोजी मालेगावच्या महाराजा सयाजी महाराज गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. तर शिवगर्जना मेळावाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेला आता एकच दिवस उरला असून महाराजा सयाजी महाराज गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. तर सभेच्या तयारीवर बारकाईने लक्ष देण्यासाठी विनायक राऊत, खासदार संजय राऊत तेथे आहेत. 1 लाखापेक्षा जास्त लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Published on: Mar 25, 2023 09:23 AM