Shivsena Political Crisis | कोकणातील एक आमदार शिंदे गटात सामील होणार?-tv9

Shivsena Political Crisis | कोकणातील एक आमदार शिंदे गटात सामील होणार?-tv9

| Updated on: Aug 19, 2022 | 9:29 AM

शिवसेनेच्या एका आमदाराने फडणवीस यांच्या भेट घेतल्याचे बोलले जात आहे. तर ते आमदार आता शिंदे गटात सामील होतील अशीही चर्चा आता जोर धरू लागली आहे.

शिवसेनेला खिंडार पडण्याचे काही थांबलेले दिसत नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत सत्ता आपल्या ताब्यात घेतली. इतकेच काय ते मुख्यमंत्रीही झाले. त्यानंतर खरी शिवसेना ही आमचीच असा नारा त्यांनी दिला. त्यानंतर राज्यातील शिवबंधनात असणारे अनेक नेते, कार्यकर्ते हे शिंदे गटात गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकावर एक धक्के बसतच आहेत. त्यानंतर आता कोकणातून देखील उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील शिवसेनेच्या एका आमदाराने फडणवीस यांच्या भेट घेतल्याचे बोलले जात आहे. तर ते आमदार आता शिंदे गटात सामील होतील अशीही चर्चा आता जोर धरू लागली आहे.