रश्मी ठाकरे पक्ष वाढवणार की सक्रीय राजकारणात उतरणार? उद्धव ठाकरे यांच्यासोबत सभेच्या मंचावर एकत्र

| Updated on: Jan 25, 2024 | 11:22 AM

रश्मी ठाकरे पहिल्यांदाच एका सभेतील व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाची सभा झाली. यासभेत उद्धव ठाकरे यांच्यासभेच रश्मी ठाकरे बसल्यात.. त्यामुळे रश्मी ठाकरे उघडपणे सक्रीय राजकारणात येणार आहे की काय? चर्चा सुरू

मुंबई, २५ जानेवारी २०२४ : ऐरवी मंचासमोर किंवा कार्यकर्त्यांसोबत बसणाऱ्या रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या सोबत मंचावर होत्या. यानंतर रश्मी ठाकरे या देखील राजकारणात सक्रीय होणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. रश्मी ठाकरे पहिल्यांदाच एका सभेतील व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाची सभा झाली. यासभेत उद्धव ठाकरे यांच्यासभेच रश्मी ठाकरे बसल्यात. त्यामुळे रश्मी ठाकरे उघडपणे सक्रीय राजकारणात येणार आहे की काय? अशी चर्चा सुरू झालीये. भास्कर जाधव यांचं भाषण सुरू असताना रश्मी ठाकरे सभा स्थळी आल्यात. यावेळी रश्मी ठाकरे यांना आता तुम्ही बाहेर पडा, अशी विनंती केली. विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी रश्मी वहिनी तुम्ही बाहेर पडा, अशी विनंती भास्कर जाधव यांनी सभेतील भाषणातून केली. बघा काय म्हणाले भास्कर जाधव?

Published on: Jan 25, 2024 11:22 AM
Maratha Reservation : … तर मी गोळ्या झेलायला तयार, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला काय इशारा?
ईडीची नोटीस, 3 पवार ‘ते’ 2 वर्ष अन् तोच 1 योगायोग; ईडीच्या नोटीवरून आरोप-प्रत्यारोप