आमचे 40 चुकार भाऊ भाजपापासून बाजूला जाणार का? सुषमा अंधारे यांचा प्रश्न

आमचे 40 चुकार भाऊ भाजपापासून बाजूला जाणार का? सुषमा अंधारे यांचा प्रश्न

| Updated on: Mar 11, 2023 | 8:14 AM

नागालँडमधील राष्ट्रवादीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला घेरल आहे.

मुंबई : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ७ आमदार निवडणून आणत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात मविआचा एक गट होत भाजपला येथे विरोध केला असताना राष्ट्रवादीने नागालँडमध्ये भाजपला हाथ दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होऊ लागली. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण देत “आमचा पाठिंबा भाजपला नसून नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी नागालँडमध्ये भाजप राष्ट्रवादीसोबत गेली आता आमचे 40 चुकार भाऊ भाजपपासून बाजूला जाणार? का असा सवाल केला आहे. सुषमा अंधारे यांनी, जे लोक राष्ट्रवादी सोबत शिवसेना गेली म्हणून बोलत होते. ते भाजपसोबत गेले. जर नागालँडमध्ये सत्तेत राष्ट्रवादी असेल तर भाजप बाहेर पडणार का? भाजप तसं करणार नसेल तर ते नकली हिंदुत्ववादी आहेत. आणि जर भाजप मधला हिंदुत्ववाद हा नकली असतील तर मग इकडचे 40 चुकार भाऊ हे भाजपचे पासून बाजूला जातील का हे त्यांना विचारलं पाहिजे.