Bawankule on Shivsena : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर येऊन Hanuman Chalisa पठण करावं

Bawankule on Shivsena : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर येऊन Hanuman Chalisa पठण करावं

| Updated on: Apr 24, 2022 | 7:22 PM

माझ्या घरासमोर येऊन हनुमान चालीसा पठण करावं. मी त्यांचं स्वागत करेन.

नागपूर : भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) म्हणाले, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी (activists) माझ्या घरासमोर येऊन हनुमान चालीसा पठण करावं. मी त्यांचं स्वागत करेन. त्यांची व्यवस्था करणार. पेंडॉल टाकून बसण्याची व्यवस्था करत लाडूचा प्रसादसुद्धा देणार. भाजपच्या नेत्याच्या घरासमोर जर कोणी हनुमान चालीसा म्हणणार म्हटलं असत तर आम्ही त्यांची व्यवस्था केली असती. त्यांना जेवण प्रसाद आणि पूजापाठची व्यवस्था केली असती. हे सरकार इंग्रजांसारखं वागत आहे. राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने विकास केला नाही.

 

Published on: Apr 24, 2022 07:20 PM