Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut |भाजपचा गड असलेल्या विदर्भावर शिवसेनेचा डोळा

Sanjay Raut |भाजपचा गड असलेल्या विदर्भावर शिवसेनेचा डोळा

| Updated on: Feb 21, 2022 | 11:22 AM

आता शिवसेना (shivsena) विदर्भात पक्ष वाढवण्यावर भर देणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी तसे संकेत दिले आहेत.

नागपूर: आता शिवसेना (shivsena) विदर्भात पक्ष वाढवण्यावर भर देणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या गडातच आपलं बस्तान बसवण्याचा प्रयत्न करणार असल्याने फडणवीस यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. विदर्भात शिवसेना वाढावी म्हणून शिवसेना पक्षांतर्गत अनेक बदल करणार आहे. विदर्भातील पक्ष संघटनेत लवकरच फेरबदल करण्यात येणार आहे. तसचे विदर्भातील शिवसेनेच्या कोट्यातील मंत्रिपदही देण्यात येणार आहे. विदर्भाला एक मंत्रीपद देऊन पक्ष विस्तार करण्यावर शिवसेनेचा भर असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, आमदार संजय राठोड यांचं शिवसेना मंत्रीपद देऊन पुन्हा पुनर्वसन करणार की नव्या चेहऱ्याला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Feb 21, 2022 11:00 AM