प्रत्येक गद्दाराला त्याची जागा दाखवू, चाळीसच्या चाळीस पाडून दाखवू, सुषमा अंधारे यांचे घणाघाती भाषण
नाशिकच्या महाअधिवेशनात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार भाषण करीत भाजपावर टीका केली. भाजपाने राम मंदिर उद्घाटन एखाद्या 'पॉलिटीकल टुल किट' प्रमाणे वापर केला. राम एक वचनी होते. परंतू यांचे नेते ज्याच्या वर 72 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करतात आणि त्यालाच सत्तेत घेतात असा आरोप सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता केला.
नाशिक | 23 जानेवारी 2024 : नाशिकच्या महाअधिवेशनात शिवसेनेच्या फायरब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे यांनी घणाघाती भाषण झाले. राम मंदिराचे उद्घाटन एखाद्या टूल किट प्रमाणे भाजपाने केले. प्रभू रामचंद्र एकवचनी होती. यांचा नेता 72 तासांपूर्वी 72 हजार कोटीच्या घोटाळ्यांचा आरोप ज्यांच्यावर करतो त्यालाच पक्षात घेतो अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता सुषमा अंधारे यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीशी युती नाही म्हणजे नाही म्हणणारे देवा भाऊ पहाटे आणि दुपारी दोन- दोन लव्ह मॅरेज करतात अशीही टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. राम मंदिर आले परंतू राम राज्य आले काय ? रामराज्य म्हणजे रात्रीची 12 वाजताही महिलेला रस्त्यावर जाताना सुरक्षित वाटले पाहीजे. परंतू मोदींच्या राज्यात खेळाडू महिलांचा अपमान होतो. हाथरससारख्या घटना होतात हे कसले रामराज्य अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ज्यावेळी आधी नाशिकचे अधिवेशन घेतले तेव्हा शिवसेनेची सत्ता आली होती. आता पुन्हा अधिवेशन होत आहे. शिवसेनेची पुन्हा सत्ता येणार असून शिवसेनेच्या चाळीसच्या चाळीस गद्दारांना आम्ही गाडू असाही घणाघात त्यांनी केला.