कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी एकास अटक!; ठाकरे गटाशी काय संबंध?
राजीव साळूंखे हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे पार्टनर आहेत. याबाबत गेल्यावर्षीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप कोला होता.
पुणे : पुण्यातील शिवाजी नगर येथील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. राजू नंदकुमार साळुंखे असे त्यांचे नाव आहे. तर राजीव साळूंखे हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे पार्टनर आहेत. याबाबत गेल्यावर्षीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप कोला होता. त्यांनी राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा दावा केला होता. या प्रकरणात एकाला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. साळुंखे यांना पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली. सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीचा विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर कोविड सेंटरमध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर पुणे महानगरपालिकेने तसेच PMRDA ने सदर कंपनी विरुद्ध तक्रार दाखल केली होती.