Chandrapur | राजे शिवाजी चौकात उत्साहात ShivJayanti साजरी, Sudhir Mungantiwar यांची उपस्थिती

Chandrapur | राजे शिवाजी चौकात उत्साहात ShivJayanti साजरी, Sudhir Mungantiwar यांची उपस्थिती

| Updated on: Feb 19, 2022 | 5:49 PM

चंद्रपुरात (Chandrapur) शिवजयंती (Shivjayanti) उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक राजे शिवाजी चौकात महाराजांच्या भित्तीशिल्पापुढे आ. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा पार पडला.

राज्यभरात आज शिवजयंतीचा उत्साह आहे. चंद्रपुरातही (Chandrapur) शिवजयंती (Shivjayanti) उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक राजे शिवाजी चौकात महाराजांच्या भित्तीशिल्पापुढे आ. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा पार पडला. पारंपरिक वाद्यांच्या निनादात छत्रपतींचा जयजयकार करत शिवजयंतीनिमित्त आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांसाठी राजे शिवछत्रपती एकच उत्तर असल्याचे प्रतिपादन आ. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले. छत्रपतींच्या पराक्रमाची गाथा मनामनात रुजवून त्यांचे गुण आत्मसात करण्याची गरज आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शिवजयंती उत्सवात बोलून दाखविली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. भगवे झेंडे, ढोल तसेच छत्रपतींचा जयजयकार असा परिसर उत्साहाच्या वातावरणात न्हाऊन निघाला होता.