...जर आम्हाला बोलवलं असतं तर आणखी आनंद झाला असता

…जर आम्हाला बोलवलं असतं तर आणखी आनंद झाला असता

| Updated on: Aug 09, 2022 | 8:15 PM

आम्हाला बोलवले नसले तरी शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार होणं गरेजेचं होतं ते महत्वाचं असून जर आम्हाला बोलवलं असतं तर त्याचा आणखी आनंद झाला असता असंही त्यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीेच सरकार जाऊन आता चाळीस दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील आता विकासाला गती मिळणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने राज्यातील अनेक कामं रखडली होती, आता मात्र त्या गोष्टीला चालना मिळणार असल्याचे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केले. यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी विनायक मेटेंना बोलवण्यात आले नव्हते त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्हाला बोलवले नसले तरी शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार होणं गरेजेचं होतं ते महत्वाचं असून जर आम्हाला बोलवलं असतं तर त्याचा आणखी आनंद झाला असता असंही त्यांनी सांगितले.