Kudal | कुडाळमधील राड्याप्रकरणी शिवसेनेच्या 20 ते 25 जणांवर गुन्हा

Kudal | कुडाळमधील राड्याप्रकरणी शिवसेनेच्या 20 ते 25 जणांवर गुन्हा

| Updated on: Jun 20, 2021 | 10:20 AM

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपच्या 10 ते 12 जणांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. कुडाळ येथील राडा प्रकरणात बेकायदा जमाव करून तसेच कोरोना काळात लोकांच्या आरोग्यास आणि जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करून केल्याप्रकरणी हे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपच्या 10 ते 12 जणांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर भादंवी कलम 188,143 अन्वये गुन्हे दाखल झाला आहे. (Shivsena and BJP workers clash in Konkan Filed Crime against 20 to 25 people)