Video : शिवसेनेचं ठरलं! संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी

Video : शिवसेनेचं ठरलं! संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी

| Updated on: May 24, 2022 | 4:38 PM

स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना उमेदवारी देणार की शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना शिवसेना राज्यसभेची (Rajya Sabha Election) उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून संभाजी छत्रपती यांनी थेट घराण्याचा दाखलाही दिला होता. छत्रपती घराण्याचा मुख्यमंत्री सन्मान करतील असा विश्वास संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शिवेसनेची राजकीय […]

स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना उमेदवारी देणार की शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना शिवसेना राज्यसभेची (Rajya Sabha Election) उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून संभाजी छत्रपती यांनी थेट घराण्याचा दाखलाही दिला होता. छत्रपती घराण्याचा मुख्यमंत्री सन्मान करतील असा विश्वास संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शिवेसनेची राजकीय कोंडी झाल्याचं सांगितलं जात होतं. शिवसेना संभाजी छत्रपती यांना पाठिंबा देईल अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र, राज्यसभेच्या सहाव्या जागेचा सस्पेन्स शिवसेनेने संपवला आहे. शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी निश्चित केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी तसं स्पष्ट विधान केलं आहे. संजय पवार यांच्या नावाची घोषणा होणार आहे. आमच्यासाठी राज्यसभेचा हा विषय संपला असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता संभाजी छत्रपती काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: May 24, 2022 04:36 PM