शिवसेनेचा खटला कोर्टात सुरू, चंद्रकांत खैरेंची स्वामी समर्थांना प्रार्थना...

शिवसेनेचा खटला कोर्टात सुरू, चंद्रकांत खैरेंची स्वामी समर्थांना प्रार्थना…

| Updated on: Sep 27, 2022 | 11:37 AM

रामशास्त्री प्रभूणेंप्रमाणेच सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंच्या धनुष्यबाणासहित इतर मागण्यांना मान्यता देईल, अशी आम्हाला आशा वाटते, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.  

दत्ता कनवटे, औरंगाबादः शिवसेना (Shivsena) विरोधात शिंदे गट (Eknath Shinde) हा सत्तासंघर्षाचा खटला सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरु आहे. यावेळी शिवसेनेचे औरंगाबादचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली. ते म्हणाले, सत्याचा विजय होऊ दे. शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली, उद्धवजींनी सांभाळलेली आहे. धनुष्यबाणावर अनेकजण निवडून आलेत. आज ते फुटलेत. घटनेपुढे यांना मान्यता मिळालेली नाही. हा तांत्रिक मुद्दा आहे. त्यामुळे रामशास्त्री प्रभूणेंप्रमाणेच सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंच्या धनुष्यबाणासहित इतर मागण्यांना मान्यता देईल, अशी आम्हाला आशा वाटते, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

Published on: Sep 27, 2022 11:37 AM