राज ठाकरे यांच्या सभेलाही तुमच्यापेक्षा जास्त गर्दी होते; शिवसेनेच्या नेत्याचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

राज ठाकरे यांच्या सभेलाही तुमच्यापेक्षा जास्त गर्दी होते; शिवसेनेच्या नेत्याचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

| Updated on: Mar 06, 2023 | 11:55 AM

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : तुम्हीच मुख्यमंत्री राहा, असं आमदार शेवटपर्यंत सांगत असताना राजीनामा का दिला? खोटं बोलू नका खरं बोला, एवढीच नम्रपणे विनंती, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

शिर्डी, अहमदनगर : उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. त्याला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे. उद्या राज ठाकरे जरी कोकणात आले तर तुमच्यासभेपेक्षा दुप्पट गर्दी होईल, असा टोला केसरकर यांनी लगावला आहे. नारायण राणेंचा पराभव करायला गेलात, तेव्हा तुमच्या उमेदवारांचं डिपॉजिट जप्त झालं. तरीही नंतरच्या काळात कोकण तुमच्या मागे उभा राहिला. शाखा प्रमुखांना कधी वर्षा बंगल्याच्या जवळही फिरकू दिलं जात नव्हतं. आता आज माझ्यावर अन्याय केला, असं दाखवून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं केसरकर म्हणाले.

Published on: Mar 06, 2023 11:53 AM