Dipali Sayyed on Amruta Fadnavis | बायकोला वाऱ्यावर सोडलं का? दिपाली सैय्यद यांचा फडणवीसांना सवाल
आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल हे सर्व बोललं जातंय. हे आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना जश्यास तसं मी दिलंय. पंतप्रधानांवर बोललं तर यांना झोमतं मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल हे कुठल्या अधिकारवाणीने बोलतात? त्यांचं बोलणं चालतं का?, त्यांना कुणी विचारत नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.
मुंबई : “माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता. अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात त्यांना कुणी बोलत नाही, मग मला रोखण्याचा अधिकार नाही”, असं अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Syed) यांनी म्हटलंय. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सवाल विचारलाय. “माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता. अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांवर टीका करतात त्यांना कुणी बोलत नाही, मग मला रोखण्याचा अधिकार नाही”,असं दिपाली सय्यद यांनी म्हटलंय. आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल हे सर्व बोललं जातंय. हे आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना जश्यास तसं मी दिलंय. पंतप्रधानांवर बोललं तर यांना झोमतं मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल हे कुठल्या अधिकारवाणीने बोलतात? त्यांचं बोलणं चालतं का?, त्यांना कुणी विचारत नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य

'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया

करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
