‘दसरा मेळाव्यात गांधी, पवारांचे विचार मांडू नका’ ठाकरेंना कुणी दिला सल्ला?
कुणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होते, तेही लवकरच कळेस, असंही शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटलंय.
अनिल केऱ्हाळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, जळगाव : दसरा मेळाव्यावरुन (Dusseha Melava Politics) शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे विचार मांडू नये, एवढीच अपेक्षा आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान, बीकेसीवर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला सगळे लागले आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि त्या निर्णयाचा सन्मान करतो, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली होती. अखेर मुंबई हायकोर्टाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. तर शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली होती. दरम्यान, आता शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या तयारीला शिंदे गटातील सगळेच नेते लागले असल्याची माहितीही गुलाबराव पाटील यांनी दिली.