‘एवढ्या वर्षांनी वाझेला कशी आठवण आली, त्याचा बोलवाता धनी…,’ राऊत यांचा धक्कादायक आरोप
अनिल देशमुख यांच्यावर ठाकरे कुटुंबाला तुरुंगात टाकण्यासाठी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या माणसामार्फत दबाव आणला होता.ईडीच्या आरोपाखाली आपण स्वत:तुरंगात जाणे पसंद केले परंतू निरपराध माणसाला तुरुंगात जाऊ दिले नसल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नंतर म्हटले होते.
उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना गोवण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणण्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते शाम मानव यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी देखील त्यास दुजोरा दिला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शाम मानव चांगले कार्यकर्ते आहेत पण ते सुपारी घेणाऱ्यांच्या हाती कसे लागले याचे आश्चर्य वाटते असा बचाव केला होता. तसेच अनिल देशमुख यांनी भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे संभाषणाचा पेन ड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील असे आव्हान दिले होते. त्यानंतर अँटिलिया बॉम्ब स्फोटक आणि हिरेन मनसुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि वादग्रस्त बडतर्फ अधिकारी सचिन वाझे याने कोर्टाच्या तारखेला आला असताना अनिल देशमुख यांच्यावर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोप केला आहे. या वर शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी सचिन वाझे याला एक वर्षांनी कशी काय जाग आली. त्याचा बोलवता धनी कोण आहे. हे सर्वांना माहिती आहे असा पलटवार केला आहे.