Manisha Kayande | ‘तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात आल्यास आनंदच’ मनिषा कायंदेंची प्रतिक्रिया
शिवसैनिकांना ठाकरे कुंटुंब यांच्यांबद्दल प्रेमच आहे. ते सक्रिय राजकारणात आले तर शिवसैनिकांना आनंदच आहे, असे मनिषा कायंदे म्हणाल्या.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे राजकारणात एन्ट्री करत आहेत. षण्मुखानंद हॉलमध्ये 15 ऑगस्ट रोजी कुटुंबीय आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार आहेत. तेजस ठाकरेंकडे युवा सेनेची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. यावर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेजस ठाकरे सर्व शिवसैनिकांध्ये परिचित आहेत. ते प्रत्येक प्रचार आणि कार्यक्रमात असतात. शिवसैनिकांना ठाकरे कुंटुंब यांच्यांबद्दल प्रेमच आहे. ते सक्रिय राजकारणात आले तर शिवसैनिकांना आनंदच आहे, असे मनिषा कायंदे म्हणाल्या.
Published on: Aug 05, 2022 09:14 PM
Latest Videos