शिंदे गटात जाणारे राजकीय गैरफायद्याचे बळी
ज्या ज्या काळात बंडखोरी करुन दुसऱ्या गटात आमदार गेले आहेत, त्यांना त्यांची जागा शिवसैनिकांनी दाखवून दिली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
बंडखोरी करुन शिंदे गटात सामील होणाऱ्या आमदारांनी व्यक्तिगत टीका करणे चुकीचे असल्याचे मत शिवसेनेच्या गटनेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनी मांडले. यावेळी त्यांनी शिवसेनेवर व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला असला तरी ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे त्यांनी पक्षप्रमुखे उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले मत मांडायला पाहिजे होते असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नारायण राणे, छगन भुजबळ यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली आणि दुसऱ्या पक्षात गेले म्हणून शिवसेनेवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही अशी आठवण करुन देत अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली म्हणून शिवसेने त्याचा काहीही परिणाम होणार नाही. ज्या ज्या काळात बंडखोरी करुन दुसऱ्या गटात आमदार गेले आहेत, त्यांना त्यांची जागा शिवसैनिकांनी दाखवून दिली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.