Sanjay Raut on Rajya Sabha Election | आम्हाला बाजारात उभे राहण्याची गरज नाही
आता या आमदारांना ईडीच्या धमक्या देण्याचे काम सूरू आहे. असे आमच्या कानावर येत आहे. त्यामुले आम्ही तयार आहोत आमचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
मुंबई : वेळ संपलेली नाही आता खरी वेळ सुरू झाली आहे. आमचे नेते भाजप नेत्यांना भेटले विनंती केली, पण भाजप त्यांच्या मतावर ठाम आहेत. आम्ही पण आमच्या मतावर ठाम आहोत. त्यामुळे आता निवडणूक होणार आहे. मविआ नेत्यांना विश्वास आहे, सहाही उमेद्वार निवडून येतील. आमची पूर्ण तयारी आहे त्यामुळे आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमदारांचा आणि मुख्यमंत्र्याचा चांगला समन्वय आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीला घाबरत नाही. आता या आमदारांना ईडीच्या धमक्या देण्याचे काम सूरू आहे. असे आमच्या कानावर येत आहे. त्यामुले आम्ही तयार आहोत आमचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
Published on: Jun 03, 2022 10:45 PM
Latest Videos