संजय राऊतांवर बोलता-बोलता भरत गोगावले 'तो' आक्षेपार्ह शब्द बोलून गेले, अन् विरोधक भडकले...

संजय राऊतांवर बोलता-बोलता भरत गोगावले ‘तो’ आक्षेपार्ह शब्द बोलून गेले, अन् विरोधक भडकले…

| Updated on: Mar 01, 2023 | 12:24 PM

"एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे", असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. त्याचे विधिमंडळात पडसाद पाहायला मिळाले.

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी काहीवेळा आधी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांवर टीका केली. यावेळी त्यांनी ‘चोरमंडळ’हा शब्द वापरला. त्यांच्या या वक्तव्याचे विधिमंडळ अधिवेशनातही पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची मागणी केली. यावर बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला. माणसाने भाड खायला पाहिजे पण एवढंही XXXX नसायला पाहिजे, असं गोगावले म्हणाले. गोगावले यांच्या वक्तव्यावर ठाकरेगटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी आक्षेप घेतला.

Published on: Mar 01, 2023 12:22 PM